Wed, May 27, 2020 18:04होमपेज › Goa › लोकसभा-१२; पोटनिवडणुकीसाठी १६ जण रिंगणात

लोकसभा-१२; पोटनिवडणुकीसाठी १६ जण रिंगणात

Published On: Apr 09 2019 1:59AM | Last Updated: Apr 09 2019 1:59AM
पणजी :  प्रतिनिधी

लोकसभा आणि तीन ठिकाणच्या विधानसभा पोटनिवडणुकीतील लढतींचे चित्र सोमवारी स्पष्ट झालेे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी, सोमवारी शिरोडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून फॉरवर्ड डेमॉक्रेटीक लेबर पार्टीचे उमेदवार  हरीश्‍चंद्र नाईक यांनी आपला अर्ज मागे घेतला. मांद्रेतून मुक्‍ती देसाई (अपक्ष) यांनी माघार घेतल्यामुळे विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात 16 उमेदवार उरले असून लोकसभा निवडणुकीतून कुणीही माघार न घेतल्याने दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी सहाप्रमाणे 12 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.  

विधानसभेच्या पोटनिवडणुकीत म्हापशातून 7, मांद्रेत 4  व शिरोड्यात  5 असे मिळून  16 उमेदवार आहेत. मांद्रे मतदारसंघातून मुक्‍ती देसाई या अपक्ष उमेदवाराने माघार घेतली. 

या दोन्ही निवडणुकांसाठी लढतींचे चित्र स्पष्ट झाल्याने आता   प्रचाराला अधिकच जोर येणार आहे.   राज्यात 23 एप्रिल रोजी लोकसभा तसेच पोटनिवडणुका होणार आहेत. 21 एप्रिल रोजी संध्याकाळी  5 वाजता प्रचाराची सांगता होईल. शिरोडा मतदारसंघातून  उमेदवारी अर्ज भरलेल्या डेमॉक्रेटिक लेबर पार्टीचे उमेदवार हरीश्‍चंद्र नाईक यांनी आपला अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेताना त्यांनी कुठलेही कारण स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे  शिरोड्यातील उमेदवारांची संख्या  6 वरून  5 झाली आहे. 

म्हापसा मतदारसंघ

म्हापसा मतदारसंघातून दिवंगत फ्रान्सिस डिसोझा यांचे पुत्र जोशुवा डिसोझा (भाजप), नगरसेवक सुधीर कांदोळकर (काँग्रेस), संजय बर्डे (राष्ट्रवादी काँग्रेस), नंदन ऊर्फ नरसिंह सावंत (गोवा सुरक्षा मंच), शेखर नाईक (आम आदमी पक्ष), आशिष शिरोडकर (अपक्ष) आणि सुदेश हसोटीकर (अपक्ष) हे सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

शिरोडा मतदारसंघ

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिरोडा मतदारसंघातून सुभाष शिरोडकर (भाजप), दीपक ढवळीकर (मगो), महादेव नाईक ( काँग्रेस), योगेश खांडेपारकर (आम आदमी पक्ष), संतोष सतरकर (गोवा सुरक्षा मंच) हे उमेदवार  रिंगणात आहेत.   

मांद्रे मतदारसंघ

मांद्रे मतदारसंघातून दयानंद सोपटे (भाजप), बाबी बागकर (काँग्रेस), स्वरूप नाईक (गोवा सुरक्षा मंच), जीत आरोलकर (अपक्ष)  हे उमेदवार रिंगणात आहेत.   

उ. गोवा लोकसभा मतदारसंघ

लोकसभेसाठी उत्तर गोव्यातून विद्यमान खासदार तथा आयुषमंत्री श्रीपाद नाईक (भाजप) यांच्यासह गिरीश चोडणकर (काँग्रेस), प्रदीप पाडगावकर (आम आदमी पक्ष), अमित आत्माराम कोरगावकर (आरपीआय), ऐश्‍वर्या साळगावकर (अपक्ष) आणि भगवंत सदानंद कामत (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहेत. 

द. गोवा लोकसभा मतदारसंघ

दक्षिण गोव्यातून अ‍ॅड. नरेंद्र सावईकर (भाजप), फ्रान्सिस सार्दिन (काँग्रेस), एल्विस गोम्स (आम आदमी पक्ष), राखी नाईक प्रभूदेसाई (शिवसेना),  डॉ. कालिदास वायंगणकर (अपक्ष) व मयूर काणकोणकर (अपक्ष) हे सहा उमेदवार रिंगणात आहेत.