Thu, May 28, 2020 07:42होमपेज › Goa › महाराष्ट्र मंडळ नेव्हल एरिया वास्को गोवाकडून पुढारी रिलीफ फाउंडेशनला १ लाख १ हजाराचा निधी

पुढारी रिलीफ फाउंडेशनला १ लाख १ हजाराचा निधी

Published On: Sep 05 2019 7:42PM | Last Updated: Sep 06 2019 3:11PM

पुढारी कराड विभागाचे व्यवस्थापक सतीश मोरे यांनी हा एक लाख 1 हजार रुपयेचा चेक स्वीकारला.वास्को (गोवा) : सतीश मोरे

महाराष्ट्र मंडळ, गोवा नेव्हल एरिया यांच्यावतीने पुढारी पूरग्रस्त रिलीफ फाउंडेशनसाठी 1 लाख 1000 रुपयाचा धनादेश देण्यात आला. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॅा. प्रतापसिंह जाधव यांनी पूरग्रस्तांसाठी सुरु केलेल्या उपक्रमाला या मंडळामुळे मोठा हातभार लागला आहे. 

गोव्यामध्ये स्थित असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी स्थापन केलेले महाराष्ट्र मंडळ गेल्या सोळा वर्षापासून विविध उपक्रम राबवत आहे. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात उद्भवलेली पूर परिस्थिती पाहून यावर्षी या मंडळाने गणेशोत्सव अतिशय साधेपणाने केला. त्यांनी गणेश उत्सवाची रक्कम तसेच मंडळाच्या शिल्लक निधीमधून पुढारी रिलीफ फाउंडेशनसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. पुढारीचे कराड विभागाचे व्यवस्थापक सतीश मोरे यांनी हा एक लाख 1 हजार रुपयांचा चेक स्वीकारला. या मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीही दीड लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. 

यावेळी बोलताना महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष एविएशन ट्रेनिंग डिव्हिजनचे विशेष सेवा मेडल प्राप्त कमोडोर हिमांशू सप्रे म्हणाले, पूरग्रस्तांच्या पाठीशी आम्ही आहोत, पुढारीने पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही कौस्तुकास्पद बाब आहे, या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही छोटासा हातभार लावला आहे.
 

या मंडळाचे उपाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले  

पूरग्रस्तांसाठी काहीतरी करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. पुढारीने पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी घेतलेल्या निर्णयात आमचा हातभार लागला याचा आम्हाला अभिमान वाटतो. पुढारीने सियाचिनमध्ये सैनिकांसाठी उभारलेले भव्य हॅास्पिटल प्रेरणादायी आहे. 

 

मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्षासह सचिव अमोल मालपे, खजिनदार मारुती पांढरे, सहसचिव प्रशांत सातवेकर तसेच सदस्य धनाजी कदम, मधुकर पाटील, संदीप माळी, प्रशांत  खाकरे, निलेश ढोक, भरत पाटील, शेंदोंकर, सचिन निर्मळे यांनी या कामी पुढाकार घेतला.