Mon, May 25, 2020 09:17होमपेज › Goa › सोशल मीडियात बदनामीची प्रतिमा कुतिन्होंची तक्रार

सोशल मीडियात बदनामीची प्रतिमा कुतिन्होंची तक्रार

Published On: Jul 17 2018 1:33AM | Last Updated: Jul 17 2018 12:37AMमडगाव ः प्रतिनिधी

प्रसारमाध्यमाद्वारे बनावट संदेश प्रसृत करून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी विल्यम्स लॉरेन्स आणि रोहन भंडारी यांच्या विरोधात सोमवारी मडगाव पोलिस स्थानकात दाखल केली. मडगाव पोलिसांनी ही तक्रार अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवून घेतली  आहे.एका पीडित युवतीची ओळख उघड केल्याबद्दल पणजी येथील महिला पोलिसांनी प्रतिमा कुतिन्हो यांची दोन तास चौकशी केली होती. मात्र सोशल मीडियातून प्रतिमा यांना अटक झाली असून सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचा संदेश पसरल्याने आपल्याला मानसिक त्रास सोसावा लागत आहे, असे प्रतिमा कुतिन्हो  यांनी सांगितले. 

महिला काँग्रेसचा आवाज दडपण्यासाठी राजकारण्यांकडून मुद्दामहून दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही कुतिन्हो यांनी  केला. गोव्यातील सर्व महिला   काँग्रेसच्या पाठीशी असून आपण राजकीय दबावाला कधीच बळी पडणार नाही, असेही त्या म्हणाल्या. महिला काँग्रेसचा आवाज मर्यादित नसून सर्व गोमंतकीय महिलांचा तो आवाज आहे, असे प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या. एरवी महिलांच्या सुरक्षेसाठी आवाज उठविणार्‍या  स्वयंसेवी संस्था तसेच पक्षांनी आपल्या बाजूनेही बोलून दाखवावे, अशी टिप्पणीही त्यांनी  केली. यावेळी जॉर्जिना गामा व महिला काँग्रेसच्या इतर सदस्या उपस्थित होत्या.