Mon, May 25, 2020 04:35होमपेज › Goa › इजिदोर फर्नांडिस उपसभापती; आज घोषणा

इजिदोर फर्नांडिस उपसभापती; आज घोषणा

Published On: Jul 25 2019 1:49AM | Last Updated: Jul 25 2019 1:49AM
पणजी: प्रतिनिधी

विधानसभेचे उपसभापती म्हणून काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांची नेमणूक निश्‍चीत झाली आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा आज, गुरुवारी  होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांनी हल्लीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागली असून त्यांना ग्रामीण विकास आणि घनकचरा व्यवस्थापन खाती देण्यात आली आहेत. उपसभापती पद रिक्‍त झाल्याने त्यासाठी बुधवारी अर्ज करण्याचा दिवस ठरविण्यात आला होता. उपसभापती पदासाठी सत्ताधारी भाजप आघाडी सरकारतर्फे इजिदोर फर्नांडिस यांचा एकमेव  अर्ज बुधवारी (आज) दाखल झाला असून विरोधकांकडून कोणीही अर्ज भरण्यास पुढे आले नाही. यामुळे आमदार फर्नांडिस  यांना उपसभापतीपद निश्‍चीत झाले असून ते गुरुवारी अधिकृतरीत्या जाहीर केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.