Mon, May 25, 2020 09:15होमपेज › Goa › उपसभापतीपदी इजिदोर फर्नांडिस बिनविरोध  

उपसभापतीपदी इजिदोर फर्नांडिस बिनविरोध  

Published On: Jul 25 2019 4:43PM | Last Updated: Jul 26 2019 1:48AM
पणजी : प्रतिनिधी

काणकोणचे भाजप आमदार इजिदोर फर्नांडिस यांची गोवा विधानसभेच्या उपसभापती पदी बिनविरोध  निवड झाली आहे. सभापती राजेश पाटणेकर यांनी फर्नांडिस यांच्या नावाची घोषणा केली.

उपसभापतीपदासाठी भाजपच्या फर्नांडिस यांच्या विरोधात विरोधी पक्षाने उमेदवारी दाखल न केल्याने इजिदोर फर्नांडिस हे उपसभापती पदी बिनविरोध निवडून आले.

फर्नांडिस यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचे सभापती पाटणेकर यांनी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी त्यांना आसनस्थ केले.