Sun, Dec 08, 2019 16:31होमपेज › Goa › उपसभापती फर्नांडिस विरोधात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश द्या

उपसभापती फर्नांडिस विरोधात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश द्या

Published On: Aug 14 2019 12:07AM | Last Updated: Aug 14 2019 12:07AM
पणजी : प्रतिनिधी 

गोवा विधानसभेचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस हे पोर्तुगीज नागरीक असून त्यांच्या विरोधात पणजी पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करुन आरटीआय कार्यकर्ते आयरीश रॉड्रिग्ज यांनी पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फर्नांडिस यांच्याविरोधात पणजी पोलिस स्थानकात 4 ऑगस्ट रोजी तक्रार देण्यात आली होती. मात्र त्यावर पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचा जन्म पोर्तुगाल येथे नोंद आहे. ते पोर्तुगिज नागरीक असून त्यांच्याकडे भारतीय नागरीकत्व नाही. त्यामुळे भारतीय घटनेनुसार ते कुठल्याही घटनात्मक पदावर राहू शकत नाहीत.ते एप्रिल 2014 पासून पोर्तुगिज नागरीक नसल्याचेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

फर्नांडिस यांच्या विरोधात पणजी पोलिसांत तक्रार करुनही कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांना तपासासंदर्भात आवश्यक ते निर्देश द्यावेत. फर्नांडिस हे राजकीय नेते असल्याने याप्रकरणी राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे. आमदार तसेच आता उपसभापती म्हणून त्यांना आर्थिक फायदा होत असून ते पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचेही अ‍ॅड. रॉड्रिग्ज यांनी याचिकेत नमूद केले आहे.

इजिदोर फर्नांडिस यांनी काँग्रेसच्या अन्य 9 आमदारांसोबत जुलै महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदी वर्णी लावण्यात आली होती.