Wed, May 27, 2020 11:56होमपेज › Goa › पणजी : त्या दोन युवकांच्या मृत्यू प्रकरणी 'एसआयटी' चौकशीची मागणी

पणजी : त्या दोन युवकांच्या मृत्यू प्रकरणी 'एसआयटी' चौकशीची मागणी

Last Updated: Dec 28 2019 5:17PM
पणजी : प्रतिनिधी 

वागातोर येथील सनर्बन संगीत रजनी महोत्सव परिसरात झालेल्या दोन युवकांच्या मृत्यू प्रकणाची विशेष तपास पथका (एसआयटी)मार्फत चौकशी करावी. तसेच या घटनेस जबाबदार सनबर्न आयोजकांविरोधात खुनाचा  गुन्हा नोंद करावा अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते ट्रोजन डिमेलो यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. या मागणी संदर्भात मुख्यमंत्र्यांना युवक काँग्रेसतर्फे निवेदन सादर करण्यात आले. सरकारने जर येत्या १५ दिवसांत एसआयटी स्थापन न केल्यास उच्च न्यायालयाने त्यांची दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी करण्यात आली.

डिमेलो म्हणाले की, वागातोर येथे आयोजित संगीत रजनी महोत्सव परिसरात आंध्रप्रदेश येथील दोन युवकांचा मृत्यु झाला. अमली पदार्थांच्या सेवनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे, तर त्यांचा मृत्यू ह्दयविकाराच्या झटक्याने झाल्याचे मुख्यमंत्री म्हणत आहेत. जर या युवकांच्या मृतदेहांवर शवविच्छेदन झालेच नाही तर त्यांचा मृत्यु हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे विधान मुख्यमंत्री कसे करत आहेत असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.