Thu, Jun 20, 2019 12:25होमपेज › Goa › उकाडा वाढला

उकाडा वाढला

Published On: Apr 11 2019 2:02AM | Last Updated: Apr 10 2019 11:57PM
पणजी : प्रतिनिधी 

राज्यात वातावरणातील उष्मा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात येत्या 14 एप्रिल रोजी काही ठिकाणी गडगडाटासह काही प्रमाणात पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. 11 ते 13 एप्रिल दरम्यान हवामान कोरडे राहील. 

राज्यात गेल्या 24 तासात  कमाल तापमान 34  अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.4 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले आहे. राज्यातील काही ठिकाणी येत्या 24 तासात किमान तापमानात अधिक वाढीची शक्यता वेधशाळेने व्यक्तकेली आहे. वातावरणात उष्मा वाढला असून उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत.  गेल्या 24 तासात मुरगाव व पणजी येथे सर्वांधिक 34 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंद झाले आहे. येत्या 48 तासात कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके कायम असेल.