Wed, Jun 26, 2019 01:04होमपेज › Goa › श्रीलंकेतील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन सतर्क  

गोव्यातील चर्चच्या सुरक्षेत वाढ   

Published On: Apr 21 2019 7:22PM | Last Updated: Apr 21 2019 7:56PM
पणजी : प्रतिनिधी

श्रीलंकेत सकाळी झालेल्या भीषण साखळी बाँम्बस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील चर्च आणि किनार्‍यांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून प्रशासन सतर्क झाले आहे,अशी माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी दिली. मुख्यमंत्री सावंत यांनी भाजप मुख्यालयात  घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

सावंत म्हणाले, की आपण सुरक्षा व्यवस्थेसंबंधी पोलिस महासंचालक प्रणब नंदा यांच्याशी चर्चा केली आहे. राज्यातील चर्च व अन्य संस्थांतील सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. राज्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांच्याशीही आपण चर्चा करणार असून त्यांना राज्यभरातील चर्चना सुरक्षा देण्याबाबत आश्‍वस्त करणार आहे. 

अधिक वाचा : श्रीलंकेत 'ईस्टर संडे'ला रक्तपात : आठ साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

मुख्यमंत्री सावंत यांनी श्रीलंकेतील हल्ल्याचा निषेध   करताना सांगितले, की राज्यात चर्चची संख्या खूप असल्याने गोव्याने अतिरिक्त सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

अधिक वाचा : ... तर श्रीलंकेतील रक्तपात टळला असता? 

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी  श्रीलंकेतील चर्चवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून सांगितले,की  संयुक्त राष्ट्र संघटनेनेही या हल्ल्याची दखल घेण्याची गरज आहे.