Thu, Jul 02, 2020 14:40होमपेज › Goa › राज्यात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

राज्यात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

Published On: Sep 04 2019 1:52AM | Last Updated: Sep 04 2019 1:52AM
पणजी : प्रतिनिधी
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात राज्यात दीड दिवसांच्या गणपतींचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. 

पणजीसह राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये मोठ्या धुमधडाक्यात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गोव्यात दीड, पाच, सात व नऊ दिवस असे घरोघरी गणपतींचे पूजन केले जाते. तर सार्वजनिक गणपतींचे पूजन सरासरी अकरा दिवस अर्थात अनंत चतुर्दशी पर्यंत केले जाते. दीड दिवसांच्या गणपतींचे मंगळवारी (दि.3) संध्याकाळी उशिरा मिरवणूक काढून तसेच फटाके वाजवून उत्साहात विसर्जन 
करण्यात आले. विसर्जनावेळी भाविकांना कुठलीही अडचण भासू नये यासाठी विसर्जनस्थळी विजेची सोय तसेच निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलशाची पणजी महानगरपालिकेकडून व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर काही ठिकाणी किनार्‍यांवर विसर्जन केले जात असल्याने तेथे कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी दृष्टी तर्फे जीवरक्षकदेखील तैनात करण्यात आले होते.