Wed, May 27, 2020 04:08होमपेज › Goa › मोन्सेरात निवडून आल्यास पणजीचे ताळगावात रूंपातर 

मोन्सेरात निवडून आल्यास पणजीचे ताळगावात रूंपातर 

Published On: May 11 2019 2:03AM | Last Updated: May 10 2019 11:55PM
पणजी : प्रतिनिधी

पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे चारीत्रहिन उमेदवार अतांनसिओ (बाबूश ) मोन्सेरात निवडून आल्यास पणजीचे ताळगावात रूंपातर होईल, अशी भीती भाजपच्या महिला नेत्या कुंदा चोडणकर यांनी पणजी येथील भाजप मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

चोडणकर म्हणाल्या, की बाबूश मोन्सेरात यांनी 2016 मध्ये अल्पवयीन मुलीवर केलेल्या कथीत बलात्कार प्रकरणामुळे गोव्याचे नाव देशात-विदेशात बदनाम झाले होते. काँग्रेसकडे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो , यतीन पारेख सारखे सज्जन उमेदवार असताना बदनाम व्यक्तीला निवडणूक रिंगणात उतरवणे योग्य नाही.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेली 25 वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना हे शहर महिलांसाठी सुरक्षित  बनवले आहे. येथे लहान मुली, महिला व अन्य भगिनी सुरक्षित मानत आहे. मात्र, मोन्सेरात सारख्या व्यक्ती जर पणजीचे आमदार म्हणून निवडून आल्यास पणजीतील महिलावर्गाला भीतीच्या सावटाखाली नियमीत रहावे लागणार आहे. पणजी राजधानीला काँग्रेस  ताळगाव बनवू पाहत आहे का, असा सवाल चोडणकर यांनी केला. 

मनपाच्या माजी महापौर व नगरसेविका वैदेही नाईक म्हणाल्या, की पणजीला सुरक्षित व सज्जन उमेदवार निवडून येण्याची आवश्यकता आहे. मोन्सेरात यांच्या तुलनेत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे खूपच सज्जन आहेत. मोन्सेरात यांचे वर्चस्व असलेल्या पणजी महानगरपालिकेत बाबूश समर्थक पॅनेल सत्तेवर असून मनपात होत असलेल्या अनेक घोटाळ्याचा व भ्रष्टाचाराचा भाजप नगरसेवक गटाने भांडाफोड केलेला आहे. पणजीत जर गुंडागिरी, दादागिरी नको असेल तर महिला वर्गाने कुंकळ्येकर यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन करत आहे.