Wed, May 27, 2020 10:58होमपेज › Goa › गोवा : कॉलसेंटरद्वारे भाजपकडून अडकलेल्यांना मदत 

गोवा : कॉलसेंटरद्वारे भाजपकडून अडकलेल्यांना मदत 

Last Updated: Apr 13 2020 4:52PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

कोरोना व्हायरसमुळे राज्यात अडकून पडलेल्या विविध राज्यातील कामगार, पर्यटक तसेच विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी भाजपने कॉलसेंटर सुरु केले आहे. भाजपकडून या सुविधेसाठी दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. गरजू व अडचणी असणाऱ्या व्यक्तींनी ०८३-२२७९६ या दूरध्वनी क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधावे, अशी माहिती सदानंद शेट तानावडे यांनी दिली. 

अधिक वाचा : गोव्यातील ९३ खलाशी जहाजावर अडकले; मुख्यमंत्र्यांकडे केली मदतीची मागणी

कॉलसेंटरच्या क्रमांकावर फोन करून तक्रार नोंद करावी. तक्रार मिळताच राज्यातील भाजप कार्यकर्ते संबंधित ठिकाणी जाऊन तक्रारदाराला हवी ती मदत देतात. संपूर्ण देशभरातील भाजप कार्यालयात कॉलसेंटर उघडण्यात आलेली आहेत, असेही तानावडे यांनी  सांगितले.

अधिक वाचा : अमेरिकी सागरी हद्दीतील जहाजे हटवण्याचा आदेश