Thu, Jul 02, 2020 15:58



होमपेज › Goa › ‘एनजीटी’च्या निर्णयाविरुद्धच्या याचिकेवर आज सुनावणी

‘एनजीटी’च्या निर्णयाविरुद्धच्या याचिकेवर आज सुनावणी

Published On: Sep 30 2019 1:47AM | Last Updated: Sep 30 2019 1:47AM




पणजी : प्रतिनिधी

राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी)शॅक्स वितरणाला घेण्यात आलेल्या आक्षेपाविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (दि.30) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल (एजी) देवीदास पांगम यांनी या माहितीला दुजोरा देऊन सांगितले, की राज्य सरकारतर्फे ‘एनजीटी’ने दिलेल्या 14 सप्टेंबरच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात शुक्रवारी आव्हान याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. शॅक्स हा गोव्याच्या पर्यटनातील महत्त्वाचा भाग असून त्यासाठी एनजीटीने दिलेला आदेश मागे घेतला जावा, यासाठी राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे.