Mon, May 25, 2020 13:57होमपेज › Goa › गोव्यात राजकीय भूकंप? विश्वजीत राणे म्हणतात..

गोव्यात राजकीय भूकंप? विश्वजीत राणे म्हणतात..

Last Updated: Dec 03 2019 1:15AM
पणजी : प्रतिनिधी

गोव्यात कोणताही राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाही. शिवसेनेला राज्यात कोणीही मान देत नसून त्यांचा एकही लोकप्रतिनिधी अस्तित्वात नाही. शिवसेनेबरोबर युती करणे म्हणजे राजकीय आत्महत्या करण्यासारखे असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. मिरामार येथील आपल्या खासगी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी राणे म्हणाले, शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी राज्यात लवकरच विरोधकांची आघाडी उघडणार असल्याचे सांगितले असून हा त्यांचा भ्रमनिरास आहे. त्यांना पूर्ण राज्यात कोणीही मान देत नाही. जे सत्तेत नाहीत, तेच आमदार विरोधी आघाडी करण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. राऊत यांनी गोव्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे सांगितले असले तरी त्यांनी सहा महिने खऱ्या भूकंपाची वाट पहावी. महाराष्ट्रातच राजकीय भूंकप होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.