Thu, Jul 02, 2020 13:47होमपेज › Goa › गोव्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे अर्धशतक

गोव्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे अर्धशतक

Last Updated: May 24 2020 6:50PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात रविवारी आणखी अकरा नव्या कोरोना‘पॉझिटिव्ह’ रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या अर्धशतकावर म्‍हणजेचं 50 वर पोहोचली आहे. सदर अकरा कोरोना रूग्ण शनिवारी राजधानी एक्‍स्‍प्रेसने मडगावला आले होते. या नविन रूग्णात सात महिला आणि चार पुरूष आहेत. नव्या अकरा रूग्णात एका 5 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. ट्रुनेट चाचणीत आणि गोमेकॉत करण्यात आलेल्या चाचणीत ते कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली.

दिल्लीहून सुटणारी राजधानी एक्सप्रेस ही सध्या गोव्यासाठी ‘कोरोना एक्सप्रेस ’ठरली आहे. आतापर्यंत या रेलगाडीतून 30 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. या रेलगाडीला गोव्यात थांबा दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले असूनही सदर रेल्वेचे मडगावातील थांबा आणि कोरोनाबाधित रूग्ण आणण्याचा प्रकार काही थांबलेला नाही. राज्यातील जनतेकडून सदर गाडी बंद करण्याची आग्रही मागणी आहे. विरोधी राजकीय नेत्यांनीही यासंबंधी सरकारवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. गोव्याला ग्रीन झोन चा दर्जा असूनही  या रेलगाडीतून परप्रांतातून आलेल्या कोरोनाबाधितांमुळे राज्याचे नाव खराब होत आहे.