Mon, Sep 16, 2019 05:29होमपेज › Goa › खाण अवलंबितांना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून मोठ्या अपेक्षा

खाण अवलंबितांना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून मोठ्या अपेक्षा

Published On: Mar 21 2019 1:28PM | Last Updated: Mar 22 2019 1:51AM
पणजी:  प्रतिनिधी

खाणग्रस्त भागातील असल्याने खाण अवलंबितांच्या समस्यांची जाणीव तुम्हाला आहे. त्यामुळे राज्यातील खाण व्यवसाय त्वरीत सुरु होण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी  गोवा मायनिंग पिपल्स फ्रंटच्या बॅनरखाली खाण अवलंबितांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची  गुरुवारी  भेट घेऊन केली.

फ्रंटचे नेते पुती गावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची साखळी येथील निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे  खाणग्रस्त भागात असलेल्या साखळी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे त्यांच्याकडून खाण अवलंबितांना मोठ्या अपेक्षा असल्याचे गावकर यांनी सांगितले.