Wed, May 27, 2020 11:13होमपेज › Goa › तिसर्‍या मांडवी पुलासंदर्भात घोटाळ्यामुळेच सरकारचे मौन

तिसर्‍या मांडवी पुलासंदर्भात घोटाळ्यामुळेच सरकारचे मौन

Published On: Feb 15 2019 1:46AM | Last Updated: Feb 15 2019 12:31AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील प्रमुख व विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेस सरकारला जनतेच्या विविध समस्यांबद्दल प्रश्‍न विचारत आलेला आहे. या प्रश्‍नांचे व समस्यांचे निरसन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यानुसार तिसर्‍या मांडवी पुलाबद्दल काँग्रेसने विचारलेल्या अनेक प्रश्‍नांवर सरकार आजही गप्प आहे. सरकारला या पुलात भ्रष्टाचार असल्याचे मान्य   आहे म्हणूनच काँग्रेस च्या प्रश्‍नांची उत्तरे देणे सरकार  टाळत आहे, असे मत काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर पत्रकार परषदेत व्यक्त केले. 

चोडणकर म्हणाले, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरूवातीपासूनच आपण भ्रष्टाचारविरोधी लढणारा नेता असल्याचे आपल्या कामातून सिध्द केले आहे. मात्र, पर्रीकर यांचे सरकार आज भ्रष्ट झाले आहे. गोवा पायाभूत  विकास महामंडळाव्दारे  तिसर्‍या मांडवी पुलाच्या बांधणीत मोठा घोटाळा या सरकारने केला आहे. 

काँग्रेसने  वेळोवेळी या पुलासंबंधी विविध विषयांवर प्रकाश टाकला व लोकांचे प्रश्‍न सरकार समोर मांडले. पूलाच्या विद्युतिकरणासाठी निविदा जारी न केल्यापासून ते पुलाचा एकूण खर्च हे सर्व विषय सरकारसमोर मांडले व प्रश्‍न विचारले. काँग्रेसच्या प्रश्‍नांना या सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. सरकार या प्रश्‍नांकडे पाठ फिरवू शकत नाही. भ्रष्टाचार करून सरकार गप्प बसू शकत नाही.  योग्य उत्तर न मिळाल्यास आम्ही लोकायुक्ताकडे जाऊ असे सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही सर्व कागदपत्रांसह तयार आहोत. त्यामुळे या सर्व प्रश्‍नांची योग्य उत्तरे सरकारने ताबडतोब द्यावी, असेही  चोडणकर यांनी सांगितले. भाजपचे आमदार निलेश काब्राल यांनी देखील ‘पुलाने लोकांचे पोट भरणार नाही’ असे विधान सरकारच्या वतीने  केले. काब्राल यांचे खरे बोलल्यावद्दल आपण अभिंनंदन करतो, असे चोडणकर यांनी सांगितले. 

श्रीपाद नाईक यांनी आज खाणी बंदीवर तोडगा सांगावा : चोडणकर 

खाण अवलंबित लोक आजही  खाण बंदीवर तोडगा निघेल या अपेक्षेत दिवस ढकलत आहेत. खाणी संदर्भात मुख्यमंत्री, खासदार व आमदारांना गेल्या एका वर्षात पंतप्रधानांची भेट ठरविण्याची व्यवस्था करणे शक्य झाले असून  त्याबद्दल आपण भाजपचे अभिंनंदन करतो, असे गिरीष चोडणकर यांनी उपरोधाने म्हटले. त्या बैठकीतही काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे.  केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी 15 फे ब्रवारीपर्यंत खाण व्यवसायावर तोडगा स्पष्ट करू असे सांगितले होते. मंत्री नाईक यांना आपण आढवण करून देतो की खाणीवर तोडगा सांगण्याची वेळ आली असून 15 फेब्रुवारी रोजी त्यांनी खाण अवलंबितांना तोडगा सांगावा, अशी चोडणकर यांनी मागणी केली.