Mon, May 25, 2020 04:15होमपेज › Goa › कर्नाटकने गोव्याला पाणी  वळवल्यास राजकीय संन्यास 

कर्नाटकने गोव्याला पाणी  वळवल्यास राजकीय संन्यास 

Last Updated: Jan 23 2020 1:45AM
फोंडा ः पुढारी वृत्तसेवा 

म्हादईवर घाला घालणार्‍या कर्नाटक राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जर न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून म्हादई ही गोव्याची आहे, असे गोवा सरकारला पत्र दिले आणि कर्नाटक सरकारला दिलेले परवाने रद्दबातल करून कर्नाटकने आतापर्यंत वळवलेले 27 टक्के पाणी पुन्हा गोव्याकडे वळते केले तर आपण राजकीय संन्यास घेऊ,असे  आव्हान मगो पक्षाचे नेते  तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी फोंड्यातील एका पत्रकार परिषदेत  दिले. 

भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा   भाजपचे काही नेते आपल्याला सल्ला देत आहेत. यासंबंधी आपल्याला एकच सांगायचे आहे, ते म्हणजे मगो हा आपला एकमेव पक्ष आहे. आणि मगो सोडून आपण कुठेही जाणार नाही. म्हादईसाठी   मगो पक्षाने आंदोलन छेडले आहे , ते गोव्याच्या     भल्यासाठीच आणि गोमंतकाचे अस्तित्व टिकवण्यासाठीच कर्नाटक आणि केंद्र सरकारने म्हादईसंबंधीचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारला देऊन येत्या विधानसभा अधिवेशनात ते पटलावर ठेवल्यास आपण राजकीय क्षेत्रातून निवृत्ती घेऊ, असे सुदिन ढवळीकर ठामपणे म्हणाले. 

सद्यस्थितीत म्हादई बचाव आंदोलन हे गोव्यासाठी महत्त्वाचे आहे. पण ‘सीएए’चे आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या नदीवर गोव्याचे अस्तित्व अवलंबून आहे, ती नदीच जर नष्ट होत असेल तर ‘सीएए’ महत्त्वाचे की म्हादई बचाव आंदोलन महत्त्वाचे हे गोमंतकीयांनी आणि राजकीय पुढार्‍यांनी ठरवायला हवे, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.