Tue, May 26, 2020 08:53होमपेज › Goa › गोव्यातील कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका

गोव्यातील कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका

Last Updated: Apr 03 2020 2:53PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

कर्नाटक आणि केरळ येथे बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याने गोव्यातील नागरिकांनी चिकन खाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केल्याने गोव्यातील कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसेल, अशी भीती अखिल गोवा पॉल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश नाईक यांनी व्यक्‍त केली आहे.  

वाचा - मिरजेत नमाज पठणसाठी जमले ४० जण 

लॉकडाऊनमुळे राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या केवळ ३० टक्केच व्यवसाय कार्यरत आहेत. मात्र, आता सरकारने लोकांना चिकन खाऊ नये, असे आवाहन केल्याने हा व्यवसाय अधिकच संकटात सापडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा - ठाण्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह

नाईक म्हणाले, बर्ड फ्लू हा हिवाळ्यात आढळून आला होता. तो ज्या भागांमध्ये आढळून आला होता त्याचा गोव्याच्या कुक्कुटपालन व्यवसायाशी कसलाच संबंध नाही. मात्र असे असतानादेखील सरकार गोव्यातील नागरिकांना चिकन खाऊ नका, असे आवाहन करीत आहे. प्रत्यक्षात असे आवाहन करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी तथ्य नक्‍की काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक  होते. परंतु, कोणताच अभ्यास न करताच त्यांनी हे विधान केले. यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाला फटका बसणार आहे. कोरोनाची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी राज्यात दरदिवशी सरासरी १.२० लाख बॉयलर कोंबड्यांची विक्री केली जायची, असे त्यांनी सांगितले.