Fri, May 29, 2020 22:45होमपेज › Goa › गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष निवडणुकीने ठरणार

गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष निवडणुकीने ठरणार

Last Updated: Jan 10 2020 7:26PM

संग्रहित छायाचित्रपणजी : प्रतिनिधी

गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष निवडणुकीसाठी उद्या (ता.१०) उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. रविवारी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संमेलनात नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती निर्वाचन अधिकारी गोविंद पर्वतकर यांनी दिली. प्रदेशाध्यक्षपदाची निवड बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

अधिक वाचा : वाघांवर विषप्रयोग केला

पणजी येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात या कार्यकर्त्यांच्या संमेलनाचे आयोजन सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे. सुमारे ८०० कार्यकर्ते सहभागी होतील असेही त्यांनी सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणूकीची प्रक्रीया शनिवारी पार पडेल. त्यानुसार दुपारी २ ते ४ दरम्यान पणजी येथील भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्विकारले जातील. 

अधिक वाचा : म्हादई अभयारण्यात ‘व्याघ्र क्षेत्र’ जाहीर करणार : मुख्यमंत्री सावंत 

या निवडणूकीत पक्षाच्या दहा आमदारांना, ४० मतदारसंघ मंडळाच्या अध्यक्षांना तसेच पक्षाचे दोन खासदार असे मिळून ५२ जणांना मतदान करता येईल. तर भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा रविवारी केली जाईल. या निवडणूकीसाठी निरीक्षक म्हणून पक्षाचे केंद्रीय नेते अविनाश राय खन्‍ना काम पहातील.