Tue, May 26, 2020 04:55होमपेज › Goa › गोवा विधानसभेत रोहन खवंटे यांच्‍या अटकेचा निषेध

गोवा विधानसभेत रोहन खवंटे यांच्‍या अटकेचा निषेध

Last Updated: Feb 06 2020 1:36PM

रोहन खवंटे यांच्‍या अटकेचा निषेध; गोवा  विधानसभेचे कामकाज  अर्ध्या तासासाठी तहकूब पणजी : पुढारी वृत्तसेवा 

विरोधी अपक्ष आमदार रोहन खवंटे यांच्या बुधवारी रात्री केलेल्या अटकेचा निषेध करून विरोधी सदस्यांनी गोवा विधानसभेचे कामकाज रोखून धरले. कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावे लागले.

►म्हादई अभयारण्यातील रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन

आमदार खंवटे यांना एका भाजप नेत्याला धमकी देण्ययाच्या प्रकरणात बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती व नंतर जामीनवर सुटकाही करण्यात आली होती. हा प्रकार विधानसभा भवनाच्या प्राकारात घडला होता.

►एस्मा दुरुस्ती विधेयक चिकित्सा समितीकडे

गुरूवारी 11.30 वाजता कामकाजाला सुरूवात झाली तेव्हा विरोधी सदस्य काळे फीते बांधूनच सभागृहात आले होते. सभापती पाटणेकर सभागृहात आल्यानंतर कामकाज सुरू करण्यापूर्वीच विरोधीपक्षनेते दिगंबर कामत यांनी खंवटे यांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला होता.

►दवर्लीच्या युवकाचा अमेरिकेत अपघाती मृत्यू

प्रकरण काय आहे ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बुधवारी सचिवालयात विधानसभा अधिवेशन सुरु असताना लॉबीमध्ये प्रेमानंद महाम्बरे यांनी पर्वरीचे आमदार रोहन खवंटे यांच्यावर बरेच आरोप केले होते. त्याबद्दल खवंटे यांनी त्यांना लॉबीमध्ये अडवून जाब विचारला होता. तर तक्रारदाराने खवंटे यांनी आपल्याला लॉबीमध्ये अडवून आपल्याशी हुज्जत घातली व धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी पोलिसांनी 323 व 341 कालमानवे आमदार खवंटे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सध्या विधानसभा अधिवेशन सुरु असून पोलिस आमदाराला थेट अटक करू शकत नाही. त्यामुळे पोलिसांनी खवंटे यांना अटक करण्यापूर्वी सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडून परवानगी घेऊन बुधवारी मध्यरात्री ही कारवाई केली.