Fri, May 29, 2020 22:46होमपेज › Goa › गोवा : खांडेपार नदीने केले रौद्ररूप धारण 

गोवा : खांडेपार नदीने केले रौद्ररूप धारण 

Published On: Aug 08 2019 12:05PM | Last Updated: Aug 14 2019 12:07AM

गोवा : खांडेपार नदीने रौद्ररूप धारण मडगाव : प्रतिनिधी

दक्षिण गोव्यातील धारबांदोडा तालुक्यातील कुळे गावातून वाहणाऱ्या खांडेपार नदीने रौद्ररूप धारण केले. खांडेपार नदीला जोडणाऱ्या फाट्यामध्ये अचानक पाण्याचा लोट आल्याने कुळेत हाहाकार माजला आहे. कुळे येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने या भागातील सहा शाळा, दोन हायस्कूल आणि चार अंगणवाड्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून खांडेपार नदी दुथडी भरून वाहत आहे. अचानक वाहत असलेल्या ओहोळातील पाणी वाढू लागले आहे.. पाहता पाहता कुळेला जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला. सुमारे वीस मिटर रस्ता पूर्ण पणे पाण्याखाली गेल्याने कुळे गावाचा सुमारे तीन तास संपर्क तुटला आहे.

पाण्यातुन वाहने पुढे नेता येत नसल्याने प्रवाशी बसेस व इतर वाहने दोन्ही बाजूनी अडकून पडली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेत पोहोचता आले नाही. शाळेला सुट्टी जाहीर केली आहे. सरपंच मनीष लंबोर यांनी दिलेल्या माहिती नुसार शिक्षक शाळेत पोचले होते, पण पाण्याचे रूद्ररूप पाहून पालकांनी आपल्या मुलांना शाळेला पाठवले नाही. सुमारे तीन तासांच्या नंतर पाणी उतरल्याची माहिती लंबोर यांनी दिली आहे.