Mon, May 25, 2020 04:56होमपेज › Goa › गोव्याचे नवनियुक्‍त राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा उद्या शपथविधी

गोव्याचे नवनियुक्‍त राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा उद्या शपथविधी

Last Updated: Nov 02 2019 8:00PM

राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे स्वागत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.पणजी : प्रतिनिधी

गोव्याचे नवनियुक्‍त राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा उद्या रविवारी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दोनापावला येथील राजभवन येथे आयोजित सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती प्रदीप नंद्राजोग हे मलिक यांना राज्यपालपदाच्या गोपयनीयतेची शपथ देतील.

शपथविधी सोहळा संध्याकाळी ४.३० वाजता पार पडेल. मलिक हे आज शनिवारी विशेष विमानाने गोव्यात दाखल झाले. यावेळी सभापती राजेश पाटणेकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मंत्री मिलींद नाईक तसेच अन्य अधिकार्‍यांनी स्वागत केले.

त्यानंतर राजभवन येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाऊन सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी जम्मू काश्मिरच्या राज्यपालपदी असलेले सत्यपाल मलिक यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.