Thu, May 28, 2020 07:44होमपेज › Goa › ‘गोवा : राज्य शासनाने परिचारिकांना पुरविल्या सर्व सुविधा’

‘गोवा : राज्य शासनाने परिचारिकांना पुरविल्या सर्व सुविधा’

Last Updated: Apr 07 2020 6:10PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना व्हायरसच्या संशयित व बाधितांवर उपचार करीत असलेल्या परिचारिकांना भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक तत्वांनुसार आवश्यक असलेले सर्व साहित्य पुरविण्यात येत आहेत. राज्य आरोग्य खात्यामार्फत परिचारिकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे, अशी माहिती अखिल भारतीय परिचारिक संघटनेच्या गोवा अध्यक्ष कुंतल केरकर यांनी दिली.

अधिक वाचा : राज्यात 13 पासून समुदाय आरोग्य सर्वेक्षण

राज्यात सध्या कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण वाढत असून बाधित रुग्णांची संख्या सातवर पोहचली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयासह (गोमेका) चिखली, साखळी, मडगाव येथील सरकारी इस्पितळांतही कोरोना संशयितांवर उपचार सुरू आहेत. गोमेकॉत आयसोलेशन विभाग तसेच मडगावातील कोविड इस्पितळात करोनाबाधितांना ठेवण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या सर्वच ठिकाणी कार्यरत असलेल्या परिचारिकांची राज्य सरकारकडून पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. परिचारिकांना आवश्यक मास्क, सॅनिटायझर, गाउन्स आदींची व्यवस्था करण्यात येत आहे, असे केरकर यांनी सांगितले. 

अधिक वाचा : कोरोना : पाच चाचणी यंत्रे, दोन हजार किट्सची खरेदी

कोरोना संशयित तसेच बाधितांवर उपचार करणार्‍या परिचारिकांसाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था देण्यात आली आहे. याशिवाय गोमेकॉतील आयसोलेशन विभाग आणि मडगावातील कोविड इस्पितळातील परिचारिकांच्या जेवण आणि राहण्याची सोयही सरकार करत आहे. त्यामुळे राज्यातील परिचारिकांना कामात कोणत्याही अडचणी येत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा : मासळी विक्रीला सशर्त परवानगी