Wed, May 27, 2020 06:02होमपेज › Goa › गोवा : लोकसभा निवडणूकीसाठी प्रदेश काँग्रेस समितीतर्फे जाहीरनामा  जाहीर 

गोवा : लोकसभा निवडणूकीसाठी प्रदेश काँग्रेस समितीतर्फे जाहीरनामा  जाहीर 

Published On: Apr 18 2019 7:16PM | Last Updated: Apr 18 2019 6:20PM
पणजी : प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीत निवडून दिल्यास खाण व्यवसाय पुन्हा सूरु करु,  नद्यांचे राष्ट्रीयीकरणाची अधिसूचना मागे घेतली जाईल. अशा विविध आश्‍वासनांचा समावेश असलेला लोकसभा निवडणूकीसाठीचा गोव्याचा जाहीरनामा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे जाहीर करण्यात आला.

पणजी येथील काँग्रेस भवनात  प्रदेशाध्यक्ष तथा उत्तर गोवा लोकसभा उमेदवार गिरीश चोडणकर , विरोधी पक्षनेते  बाबू कवळेकर तसेच अन्य  आमदारांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला.  गोवा प्रदेश काँग्रेस समितीने तयार केलेल्या जाहीरनाम्यात , सर्वोच्च न्यायालयाच्या आराखडयानुसार तसेच खाण व खनिज कायदा १९५७ प्रमाणे गोव्यात भविष्यपुरक पध्दतीने खनिज व्यवसाय पुन्हा सूरु करणे. गोव्याच्या जमिनी तसेच राज्याची ओळख जपण्यासाठी संसदेला कायदा तयार करायला लावण्यासाठी विशेष पुढकार घेतला जाईल. जनतेला फार्मेलिनमुक्‍त मासळी देणे, नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाची अधिसूचना मागे घेणे या आश्‍वासनांचा  समावेश  चोडणकर यांनी सांगितले.

त्याचबरोबर  गोव्याचे समुद्रकिनारे व त्यावर अवलंबून असलेले पारंपरिक मच्छीमारांना संरक्षण देणे,  खासदार निधी अंतर्गत  प्रकल्पासाठी अर्ज करणार्‍यांना निधी सहज व पारदर्शकपणे उपलब्ध करणे, खलाशी कल्याण संघटनेच्या कामाची चिकीत्सा करुन   त्यांच्या आर्थिक सहाय्य योजनेचा आढावा घेऊन ती पुर्नसंचयीत केली जाईल असे आश्‍वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.