Thu, May 28, 2020 07:38होमपेज › Goa › गोव्यातील काँग्रेसचे आमदार वेतनातील ३० टक्के रक्कम मदत निधीसाठी देणार

गोव्यातील काँग्रेसचे आमदार वेतनातील ३० टक्के रक्कम मदत निधीसाठी देणार

Last Updated: Apr 09 2020 6:20PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

काँग्रेसचे सर्व पाच आमदार आपल्या एका वर्षाच्या पगारातील ३० टक्के रक्कम कोवीड - १९ विरुध्दच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा करतील, अशी माहिती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात दिली आहे. 

अधिक वाचा : गोवा : एका रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह 

देशभरासह गोव्यात देखील सध्या कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर लढयासाठी मुख्यमंत्री मदत निधीची घोषणा करण्यात आली आहे. या निधीत आता गोव्यातील विरोधी आमदारांनी देखील मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा : ‘गोवा : राज्य शासनाने परिचारिकांना पुरविल्या सर्व सुविधा’

कोवीडच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या सर्व खासदारांनी आपला ३० टक्के पगार पंतप्रधान मदत निधीसाठी द्यावा असा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला होता. पंतप्रधान मदत निधीसाठी आपल्या पगारातील ३० टक्के भाग देणे हा गांधी यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. गांधी यांच्या या निर्णयाला गोव्यातील आमदारांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. त्यानुसार गोव्यातील काँग्रेसचे आमदार आपल्या वर्षाच्या पगारातींल ३० टक्के हिस्सा हा मुख्यमंत्री मदत निधीसाठी देतील. 

अधिक वाचा : राज्यात 13 पासून समुदाय आरोग्य सर्वेक्षण