Mon, May 25, 2020 11:20होमपेज › Goa › गोवा मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

गोवा मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

Published On: Mar 22 2019 7:30PM | Last Updated: Mar 23 2019 1:13AM
पणजी : प्रतिनिधी

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत करण्यात आलेल्या सल्ला मसलतीनंतर तसेच राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मान्यता दिल्यानंतर मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. मंत्रिमंडळातील खातेवाटपाची अधिसूचना शुक्रवारी संध्याकाळी कार्मिक खात्याकडून जारी करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे असलेली खाती समान ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे अर्थ, गृह, पर्सनल, उद्योग, खाण, वन, शिक्षण, पर्यावरण खाती आहेत. उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, वाहतूक, नदी परिवहन व संग्रहालय खाती देण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे नगर नियोजन, कृषी, पुरातत्त्व, कारखाने व बाष्पक खाते देण्यात आले आहे. मनोहर (बाबू) आजगावकर यांच्याकडे पर्यटन, क्रीडा, छापखाना खाते सोपवण्यात आले आहे. 

इतर मंत्र्यांचे खाते पुढीलप्रमाणे : 

रोहन खंवटे : महसूल, आयटी, रोजगार व मजूर खाते

विश्वजीत राणे : आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, हस्तकला प्रशिक्षण खाते

गोविंद गावडे : अनुसूचित जमाती कल्याण, कला व संस्कृती, नागरी पुरवठा खाते

माविन गुदिन्हो : पंचायत, शिष्टाचार, पशूसंवर्धन खाते

जयेश साळगावकर : गृहनिर्माण, बंदर कप्तान, ग्रामीण विकास खाते

विनोद पालयेकर : जलसंसाधन, मच्छिमार, वजन व माप खाते

निलेश काब्राल : वीज, सौर  ऊर्जा, कायदा व न्याय खाते

मिलिंद नाईक : समाज कल्याण व नगर विकास खाते