Mon, May 25, 2020 09:09होमपेज › Goa › काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी द्या

काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी द्या

Published On: Oct 16 2018 1:40AM | Last Updated: Oct 16 2018 12:46AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील भाजप सरकारचे प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे. काँग्रेसकडे पुरेसे बहुमत असल्याने ते सिद्ध करण्याची संधी मिळावी, अशा आशयाची मागणी करणारे पत्र गोवा प्रदेश काँग्रेसने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सोमवारी दिल्लीत सादर केले.

काँग्रेसकडून  सरकार स्थापनेचा दावा केला जात आहे. त्यामुळे   राज्यपालांनी गोवा विधानसभा विसर्जित करू नये. यासंदर्भात  राज्यपालांना आवश्यक ते निर्देश दिले जावेत, अशी मागणीही राष्ट्रपतींकडे सदर पत्राद्वारे करण्यात आली आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, गोवा  राज्यपालांकडे यापूर्वी काँग्रेसने   सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यामुळे काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी बोलावण्यापूर्वी गोवा विधानससभा  विसर्जित करण्याचा कुठलाही निर्णय घेतला जाऊ नये. जनतेच्या इच्छेचा विचार करता विधानसभा बरखास्त 0करणे, हा योग्य पर्याय ठरत नाही. त्यामुळे याबाबत राष्ट्रपतींनी राज्यपालांना त्या दिशेने आवश्यक ते निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी  सांगितले. 

यापूर्वीदेखील मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्रिपदी असताना मंत्रिमंडळात  बेकायदेशीररित्या ठराव घेऊन गोवा विधानसभा बरखास्त करण्यात आली होती. त्यामुळे या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये. काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ आहे.  काँग्रेसकडे  16 आमदार आहेत. त्यामुळे  बहुमत सिध्द करण्याची संधी काँग्रेसला मिळावी, अशी मागणी  पत्राद्वारे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पर्रीकर आजारी असल्याने प्रशासन ठप्प झाले आहे.   गोव्याच्या जनतेला भेडसावणार्‍या समस्यांवर तोडगा काढण्यास सरकारला अपयश आले आहे.   भाजप युती सरकारने जनतेचा विश्‍वास गमावण्याबरोबरच विधानसभेतील बहुमत गमावल्याचेही चोडणकर यांनी   सांगितले.