Tue, May 26, 2020 06:26होमपेज › Goa › गिरीश चोडणकरांचा उमेदवारी अर्ज दाखल 

गिरीश चोडणकरांचा उमेदवारी अर्ज दाखल 

Published On: Apr 01 2019 7:45PM | Last Updated: Apr 01 2019 7:08PM
पणजी :  प्रतिनिधी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी  सोमवारी  उत्तर गोवा लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांनी आपण  लोकसभेत गोमंतकीयांचा आवाज बनणार असे अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांच्याकडे हा उमेदवारी अर्ज सादर  करण्यात आला. यावेळी  विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे, निळकंठ हळर्णकर, जेनिफर मोन्सेरात व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

चोडणकर म्हणाले, लोकसभाग निवडणूक प्रचारात केंद्र तसेच राज्यातील विविध विषय हाताळण्यात येतील. 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारावेळी गोव्याला विशेष दर्जा देणे, खाण व्यवसाय समस्या सोडवणे  अशी आश्‍वासने दिली होती. मात्र या आश्‍वासनांची  पुर्तता अजूनही झालेली नसल्याची टीका त्यांनी केली.

उत्तर गोव्यातील मागील 20 वर्षापासून असलेल्या खासदारांनी जनतेचा किती आवाज  लोकसभेत उठवला असा प्रश्‍न त्यांनी केला.  निवडून आल्यानंतर आपण लोकसभेत गोमंतकीयांचा आवाज बनणार असे अश्वासन यावेळी चोडणकर यांनी दिले.