Wed, Jul 08, 2020 14:14होमपेज › Goa › प्रादेशिक आराखडा विरोधात आव्हान याचिका दाखल

प्रादेशिक आराखडा विरोधात आव्हान याचिका दाखल

Published On: Jul 02 2019 2:01AM | Last Updated: Jul 01 2019 11:43PM
पणजी : प्रतिनिधी

राज्याच्या प्रादेशिक आराखडा 2021 च्या अंमलबजावणीला आव्हान देणारी पिळर्ण सिटीझन फोरमने 3 मे रोजी सादर केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सोमवारी दाखल करुन घेतली. न्यायालयाने यावेळी प्रतिवाद्यांना नोटीसा बजावून बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेवरील सुनावणी 15 जुलै रोजी होईल. 

राज्याचा प्रादेेशिक आराखडा 2021 हा घातक आहे. या आराखड्यामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे. मध्यंतरी हा अराखडा स्थगित ठेवण्यात आला होता. मात्र, सरकारने या प्रादेशिक आराखड्यावरील स्थगिती उठवली असून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. प्रादेशिक आराखडा 2021 ची अंमलबजावणी होऊ नये, अशी मागणी याचिकादार पिळर्ण सिटीझन फोरमतर्फे न्यायालयात करण्यात आली आहे.पिळर्ण सिटीझन फोरम सुरवातीपासूनच या आराखड्याला विरोध करीत होता. प्रादेशिक आराखडा 2021 ची अंमलबजावणी केली जात असतानाच झोनमध्येदेखील हवे तसे बदल करण्यात आले आहेत. याशिवाय प्रादेशिक आराखड्याअंतर्गत येणार्‍या गावाचा बाह्य विकास आराखड्यात (ओडीपी) समावेश करण्यात आला असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

या आव्हान याचिकेसोबत कशा प्रकारे बेकायदेशीरपणे झोन बदल करण्यात आले हे दाखवणारी कागदपत्रेदेखील याचिकादाराकडून जोडण्यात आली आहेत.