Wed, Jul 08, 2020 14:16होमपेज › Goa › मडगाव : कपड्याच्या दुकानाला भीषण आग 

मडगाव : कपड्याच्या दुकानाला भीषण आग 

Published On: Jul 15 2019 11:08AM | Last Updated: Jul 15 2019 11:08AM
मडगाव : प्रतिनिधी

मडगाव येथील आंध्रा बँकेच्या खाली असलेल्या रेडिमेड कपड्यांच्या दुकानाला अचानक आग लागली. या आगीत या दुकानाचे मोठे नुकसान झाले. आज, सोमवार (दि.१५) सकाळच्या सुमारास ही आग लागली. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सकाळच्या सुमारास रेडिमेड कपड्यांच्या दुकानांतून धूर येत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तत्काळ याची माहिती मडगाव अग्निशामक दलाला दिली. या आगीची माहिती मिळून देखील अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहोचण्यास सुमारे अर्धा तास लागला. यामुळे तासाभरात दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. यात दुकान मालकाचे मोठे नुकसान झाले.

तर, सोमवारी सकाळी उड्डाणपूलाजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. त्यात हा आगीचा प्रकार घडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.