Mon, May 25, 2020 11:42होमपेज › Goa › दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्‍क

दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्‍क

Published On: Apr 24 2019 1:37AM | Last Updated: Apr 24 2019 1:37AM
मडगाव : प्रतिनिधी 

काँग्रेसच्या उत्तर गोवा लोकसभा निवडणुकीचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी फातोर्डा येथे मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे उमेदवार तथा खासदार नरेंद्र सावईकर यांनी फोंडा येथील मतदान केंद्रावर सपत्निक मतदान केले. 
सामान्य लोकांसह दक्षिण गोव्यातील राजकारण्यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला.उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी पत्नी आणि वडिलांबरोबर फातोर्डा येथील मतदान केंद्रावर मतदान केले.आमदार चर्चिल आलेमाव, विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर, आमदार दिगंबर कामत यांनीही सकाळच्या सत्रात मतदान केले

उत्तर गोवा लोकसभेचे काँग्रेस उमेदवार गिरीश चोडणकर हे मूळ फातोर्डा येथील रहिवाशी आहेत. त्यांनी सकाळीच फातोर्डा येथील मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून मतदान केले.उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी पत्नी उषा सरदेसाईं आणि वडिल जयवंत सरदेसाई यांच्या बरोबर 30 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदान केले. आपचे उमेदवार एल्विस गोम्स यांनी कुंकळ्ळी येथे मतदान केले. विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांनी बेतुल येथे मतदानाचा हक्क बजावला. ज्या ठिकाणी काँग्रेसचे मतदार अधिक आहेत. अशा मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे काशी बिघडतात असा प्रश्‍न कवळेकर यांनी उपस्थित केला.कुंकळ्ळी येथील मतदान केंद्रावरील मतदान यंत्र खराब झाल्याचा प्रकार समोर आला होता. असाच प्रकार अवेडे आणि बेतुल येथे घडला आहे.आम्ही निवडणूक आयोगाकडे या बाबत लेखी तक्रार करणार आहोत, असे बाबू कवळेकर म्हणाले. 

काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांनी कुडतरी मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी कावरे येथील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.