Thu, Jul 16, 2020 06:59होमपेज › Goa › हळदोणेत खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण

हळदोणेत खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण

Published On: Sep 21 2019 1:30AM | Last Updated: Sep 21 2019 1:30AM
म्हापसा : प्रतिनिधी 

हळदोणे  मतदार संघात गेले चार दिवस होत असलेल्या खंडित  वीज पुरवठ्यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. सोमवार ते गुरुवारपर्यंत सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे लोकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाल्याने हळदोणेतील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

सतत चार दिवस सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी वीज पुरवठा खंडित होतो व सायंकाळी 3 ते 5 वाजून 30  मिनिटांनी पूर्ववत होतो. सकाळी एकाच वेळी वीज पुरवठा करणार्‍या उपकरणांमध्ये कसा बिघाड होऊ  शकतो, असा प्रश्न हळदोणेतील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

नास्नोळा वीज  उपकेंद्रातील वीज फिडर सोमवारी दि.16 रोजी खराब झाला. मंगळवारी पर्वरी वीज उपकेंद्राला जोडणारे 33 केव्ही उच्च दाबाची वीज वाहिनी तुटली,,  बुधवारी या उच्च दाबाच्या वाहिनीवर पक्षी अडकल्याने वीज  कंडक्टर खराब झाले  तर गुरुवारी थिवी  फुटबॉल मैदानाजवळ उपकेंद्राला जोडणार्‍या उच्च दाबाच्या वीज वाहिनीवर कबूतर अडकल्यामुळे वीज  कंडक्टर खराब झाला त्या विविध कारणांमुळे सलग चार दिवस वीज पुरवठा खंडित झाल्याचा दावा खात्याच्या अधिकार्‍यांनी केला आहे.  

नास्नोळा  वीज उपकेंद्र मतदार संघातील  पोंबुर्फा - वळावली, नास्नोळा, मयडे, उसकई -   पालये, पुनोळा - बसतोडा यासह पंचायत क्षेत्राला वीज पुरवठा केला जातो. तसेच थिवी  वीज उपकेंद्र यातून पर्वरी वीज उपकेंद्राला जोडणारा वीज पुरवठा वीज उपकेंद्र नास्नोळा वीज उपकेंद्रातूनच दिला  जातो .  वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे येथील लोक हैराण झाले आहेत वीज पुरवठा खंडित होण्यामागची योग्य कारणे अधिकारी व कर्मचार्‍यांकडून मिळत नसल्याने लोकांनीच खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

प्राप्त माहितीनुसार गेल्या 13 ऑगस्ट रोजी नास्नोळा  वीज उपकेंद्र जवळ पर्वरीला  जोडणार्‍या  उच्च दाबाच्या वीज वाहिनीवर दोन मोर पक्षी उडताना अडकले होते. त्यामुळे थिवी वीज  उपकेंद्रात 10 एमव्ही हा वीज फिडर  खराब झाला होता. तसेच नास्नोळा  वीज केंद्रातील दुहेरी सर्किट कंडक्टर ही खराब झाले होते. कंडक्टर खात्याने दुरुस्त केले परंतु 450 क्षमतेचे कंडक्टर सर्किट फक्त 250 दाबाचा भार घेत  असल्याचे खात्याच्या अधिकार्‍यांना आढळून आले आहे. हे सर्किट नवे बसवण्यासाठी तसेच  वीज वाहिनीवर अडकलेले मोर पक्षी काढण्याचे काम हाती घेण्यासाठी वीजपुरवठा खंडित करावा लागणार आहे. गणेश चतुर्थीच्या सणामुळे खात्याने हे काम पुढे ढकलले होते. आता हे काम हाती घेण्याचा विचार अधिकार्‍यांनी चालवला होता. परंतु गेले चार दिवस वेगवेगळ्या कारणात्सव वीज  उपकरणात बिघाड होऊ लागला असून या बिघाडाच्या  दुरुस्तीसाठी वीज  खंडित करावा लागत आहे.

नास्नोळा वीज उपकेंद्रातील दुहेरी कंडक्टर सर्किट खराब झाले आहे. त्याजागी  450  क्षमतेचे नवे सर्किट बसवण्यासाठी खात्याने अंदाजपत्रक तयार केले आहे ते उभारल्यानंतर वारंवार वीजपुरवठा खंडित होणारी समस्या दूर होईल. 
शैलेश नाईक बुर्ये, 
वीज खात्याचे कार्यकारी अभियंता