Mon, May 25, 2020 14:05होमपेज › Goa › दिगंबर कामत गोव्याचे विरोधी पक्षनेता

दिगंबर कामत गोव्याचे विरोधी पक्षनेता

Published On: Jul 18 2019 1:57AM | Last Updated: Jul 17 2019 9:02PM
पणजी : प्रतिनिधी

गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून दिगंबर कामत यांच्या निवडणुकीस अखिल भारतीय काँग्रेस समितीने मंजुरी दिली असल्याची माहिती गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

चोडणकर यांनी दिगंबर कामत यांचे अभिनंदन केले तसेच जनतेच्या आणि पक्षाच्या सेवेत त्यांना यश मिळो, अशी शुभेच्छा व्यक्त केली आहे. कामत यांना पूर्ण सहकार्य आणि समर्थन देऊ असे म्हटले आहे, कामत यांच्या दीर्घ राजकीय अनुभवामुळे ते पक्षाला राज्यात मोठ्या उंचीपर्यंत नेतील. राज्यातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन ते भ्रष्टाचार आणि गोमंतक विरोधी निर्णय लोकांपुढे उघडे पाडतील, अशी आशा व्यक्त केली आहे.