Wed, May 27, 2020 06:11होमपेज › Goa › कारापूर अपघातात पोलिस उपनिरीक्षक ठार

कारापूर अपघातात पोलिस उपनिरीक्षक ठार

Last Updated: Mar 23 2020 10:15PM

संग्रहीत छायाचित्रडिचोली : पुढारी वृत्तसेवा  

साखळी कारापूर येथे सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास झालेल्या स्वयंअपघातात डिचोली पोलिस स्थानकाचे  पोलिस उपनिरीक्षक किरण  विठोबा मामलेदार (32  रा.दुर्भाट  फोंडा)  हे  जागीच ठार झाले.

डिचोली पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार किरण मामलेदार हे दुर्भाट येथील  आपल्या घराकडून  जीए-08-के-5733  क्रमांकाच्या कारने डिचोली पोलिस स्थानकात   कामावर येण्यासाठी निघाले.  डिचोलीला येत असताना पहाटे 3 वाजण्याच्या सुमरास  कारापूर येथील  पाण्याच्या  टाकीजवळ पोचले  असता  कारवरील त्यांचा ताबा सुटल्याने  कारची दगडाला धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. डिचोली पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच  घटनास्थळी धावले. मामलेदार यांना त्वरित गाडीत घालून  उपचारासाठी  बांबोळीला नेण्यात आले. बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्याल इस्पितळातील डॉक्टारांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोेषित केले.  उत्तरीय तपासणीनंतर  मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.  सोमवारी सायंकाळी शोकाकुल वातारवरणात  दुर्भाट स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. या वेळी पोलिसांनी मानवंदना दिली.