Mon, May 25, 2020 09:55होमपेज › Goa › ‘ईव्हीएम’ स्ट्राँगरूममध्ये बुधवारी उशिरापर्यंत जमा

‘ईव्हीएम’ स्ट्राँगरूममध्ये बुधवारी उशिरापर्यंत जमा

Published On: Apr 25 2019 1:43AM | Last Updated: Apr 25 2019 12:19AM
पणजी : प्रतिनिधी

गोव्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी   व  विधानसभेच्या 3 पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी (दि.23) मतदान पार पडले. मात्र, ईव्हीएम यंत्रे सील करून  पणजी येथील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्याची प्रक्रिया  बुधवारी संध्याकाळपर्यंत सुरू होती. त्यामुळे  सोमवार,  22 एप्रिल रोजी निवडणूक ड्युटीवरील कर्मचारी बुधवारी दुपारपर्यंत  झोप न मिळाल्याने पेंगुळले होते.  

लोकसभा  निवडणुकीसाठी   23 एप्रिल रोजी सकाळी 7 ते संध्याकाळ 6 वाजेपर्यंत मतदान  पार पडले. मतदारांची  रांग लक्षात घेतला काही मतदान केंद्रावर संध्याकाळी 6.15 पर्यंत मतदान पार  पडले.  मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर  ईव्हीएम  यंत्रे सीलबंद करून   स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली आहेत. उत्तर गोव्यात बाल भवन येथे हा स्ट्राँगरूम तयार केली असून तिथे 24 तास कडक  पहारा ठेवला आहे. प्रत्यक्षात सदर इव्हीएम यंत्रे स्ट्राँगरुम मध्ये 23 एप्रिल रोजी रात्री उशीरापर्यंत   पोहोचणे अपेक्षित होते, मात्र,  बुधवारी संध्याकाळपयर्र्ंत  ती यंत्रे स्ट्राँगरूममध्ये नेली जात असल्याचे चित्र पहायला मिळत होते. 

पणजी येथील गोवा पॉलिटेक्निक  महाविद्यालयात    मतदान  केंद्रे  उभारली होती.  येथून   ही यंत्रे बाल भवन येथील स्ट्राँगरूममध्ये नेली जात होती.  सदर प्रक्रिया उशिरा झाल्याने निवडणूक ड्युटीवरील कर्मचार्‍यांचे बरेच हाल झाले. सलग दोन दिवसांच्या ड्युटीमुळे   हैराण झालेल्या  काहींनी तर गोवा पॉलिटेक्निक  महाविद्यालयाच्या पायर्‍यांवरच झोपणे पसंत केले.दरम्यान, याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.