Wed, Jul 08, 2020 12:25होमपेज › Goa › ‘दाबोळी’ची धावपट्टी देखभालीसाठी दर शनिवारी बंद

‘दाबोळी’ची धावपट्टी देखभालीसाठी दर शनिवारी बंद

Published On: Sep 12 2019 1:48AM | Last Updated: Sep 12 2019 12:02AM
दाबोळी : प्रतिनिधी
दाबोळी   विमानतळावरील  धावपट्टी   दरवर्षीप्रमाणे  देखभालीसाठी दर शनिवारी बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला आहे. यंदा नेहमीपेक्षा एक तास अधिक काळ प्रवासी विमानसेवेसाठी धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.

दाबोळी विमानतळाची धावपट्टी देखभालीसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळ्यात प्रत्येक शनिवारी सकाळी 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत या वेळेत नौदल विमानांच्या कवायतींसाठी बंद असते. मात्र आता ती सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 या वेळेत बंद राहिल, अशी माहिती दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलीक यांनी दिली. देखभाल, दुरुस्ती तसेच इतर आवश्यक कामे करण्यासाठी हिवाळ्यात धावपट्टी प्रत्येक शनिवारी पाच तास बंद ठेवण्यात येणार आहे. ऐन पर्यटन हंगामात सदर धावपट्टीचे काम हाती घेण्यात येत असले तरी त्या काळात हे काम करणे गरजेचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. या धावपट्टीचे काम नौदलाकडून हाती घेण्यात येणार आहे. 2 नोव्हेंबरपासून प्रत्येक शनिवारी होणारी धावपट्टी दुरुस्तीचा बंदीकाळ मे महिन्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता  असल्याचे सूत्रांकडून समजते.