Tue, May 26, 2020 05:38होमपेज › Goa › कारवार अपघातात दाम्पत्य ठार; दोन मुले जखमी

कारवार अपघातात दाम्पत्य ठार; दोन मुले जखमी

Last Updated: Jan 28 2020 12:09AM
काणकोण : पुढारी वृत्तसेवा
कारवार येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर सोमवारी सकाळी जीए -08, ई 8164 या कारने एका मालवाहू लॉरीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात वाहन चालक विष्णू एम. नाईक व त्याची पत्नी कुंदा नाईक (रा.ओरली-कोलवा) हे दाम्पत्य जागीच ठार झाले.

गाडीत असलेली वैष्णवी व सानवी ही त्यांची मुले जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णू नाईक हे मूळचे कुमठा, कारवार येथील असून सध्या ते ओरली, कोलवा येथे राहत होते.कोलवा येथील लिला बीच रिसॉर्टमध्ये ते काम करीत होते. ते सोमवारी आपल्या पत्नी मुलांसह मूळ गावी कुमठा येथे जात असताना हा अपघात घडला.