Sun, May 31, 2020 14:37होमपेज › Goa › दक्षिण गोव्याची जागा भाजपने गमावली

दक्षिण गोव्याची जागा भाजपने गमावली

Published On: May 23 2019 8:53AM | Last Updated: May 23 2019 9:07PM
पणजी : प्रतिनिधी

दक्षिण गोवा लोकसभेची जागा भाजपने गमावली आहे. तर उत्तर गोव्याची जागा राखण्यात भाजपला यश आले आहे. तर चार विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने तीन जागांवर विजय मिळवला. मात्र, दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा बालेकिल्ला असलेला पणजी मतदारसंघ भाजपने गमाविला. येथे काँग्रेसचे उमेदवार उमेदवार अतांनसिओ (बाबूश) मोन्सेरात विजयी झाले.  

दक्षिण गोव्यात काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दीन यांनी भाजपचे नरेंद्र सावईकर यांचा १५,२६८ मतांनी पराभव केला. तर उत्तर गोव्यात केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांचा पराभव केला.

गोव्यात अन्य तीन ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. मांद्रे मतदारसंघातून भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे, म्हापशातून जोशुआ डिसोझा आणि शिरोड्यातून सुभाष शिरोडकर विजयी झाले आहे.