Sun, May 31, 2020 16:48होमपेज › Goa › पणजीत सीसीटीव्ही कॅमेरा व्यवहारात भ्रष्टाचार : साईश म्हांब्रे

पणजीत सीसीटीव्ही कॅमेरा व्यवहारात भ्रष्टाचार : साईश म्हांब्रे

Published On: May 06 2019 7:45PM | Last Updated: May 06 2019 7:16PM
पणजी :  प्रतिनिधी

पणजी शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत १८० कोटी रुपये खर्च करुन बसवण्यात येणार्‍या ४५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या  व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते साईश म्हांब्रे यांनी पत्रकार परिषदेत केला. इमेजिन पणजी स्मार्ट सिटी कॉरपोरेशनने या व्यवहाराबाबत त्वरीत श्‍वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

म्हांब्रे म्हणाले, पणजी शहरातील वाहतूक तसेच पार्कींग व्यवस्थापनासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत इमेजिन पणजी स्मार्ट सिटी कॉरपोरेशनतर्फे १८० कोटी रुपये खर्च करुन ४५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असल्याचे एप्रिल २०१८ मध्ये सांगण्यात आले होते. यासाठी निविदा मागवण्यात आल्या. त्यासाठी  चार कंपन्यांची निवड करण्यात आली होती. त्या चारपैकी एल अ‍ॅण्ड टी या कंपनीची निवड करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

सर्व कॅमेरे सहा महिन्यात बसवण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार या कंपनीला जुलैमध्ये २१ कोटी रुपयांची रक्‍कमही देण्यात आली होती. मात्र आता वर्ष होत आले तरी एकही कॅमेरा बसवण्यात आलेला नाही. १८० कोटी रुपयांना  ४५० सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे एका कॅमेर्‍याची किंमत जवळपास ४ लाख रुपये इतकी होते. तर याच कंपनीने मुंबई व पुणे शहरात जवळपास १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत माफक दरात बसवले असल्याची माहिती त्यांनी दिली.