Tue, May 26, 2020 08:36होमपेज › Goa › कोरोना: गोमेकॉत  नऊ संशयित रुग्ण

कोरोना: गोमेकॉत  नऊ संशयित रुग्ण

Last Updated: Mar 21 2020 1:14AM
पणजी: पुढारी वृत्तसेवा

गोव्यातही कोरोनाव्हायरस’चा प्रभाव वाढला असून मंगळवारी दाखल झालेले पाच संशयितांपैकी एका संशयित रूग्णाचा अहवाल ‘निगेटीव्ह’ आला असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. गोमेकॉत बुधवारी नवे पाच संशयित रुग्ण गोमेकॉच्या ‘आयसोलेशन’ वार्डात भरती करण्यात आले आहेत. या नऊही संशयितांचे रक्ताचे आणि थुंकीचे नमूने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. गोमेकॉतील मंगळवारी दाखल करण्यात आलेल्या  राज्यात अजून एकही ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण सापडला नसल्याची माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली. 

‘कोरोनाव्हायरस’च्या रुग्णांसाठी मडगाव येथील ‘इएसआय’ इस्पितळाचीही निवड करण्यात आली आहे. दाबोळी विमानतळावरून संशयित रुग्णांना या इस्पितळात नेण्यासाठी कदंबच्या चार बसेस नियमीतरीत्या तैनात असणार आहेत.  दाबोळी विमानतळावर बुधवारी  431 प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात आले असून आतापर्यंत 15 हजार 942 प्रवाशांची तपासणी झाली आहे. घरातच राहून नजर ठेवल्या जात असलेल्या संशयित रुग्णांची संख्या 133 असल्याची माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले.