Mon, May 25, 2020 04:13होमपेज › Goa › राज्यात घटनात्मक पेचप्रंसग : कवळेकर 

राज्यात घटनात्मक पेचप्रंसग : कवळेकर 

Published On: Mar 18 2019 1:57AM | Last Updated: Mar 18 2019 1:50AM
पणजी : प्रतिनिधी

 राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला असून भाजप आघाडी सरकारकडून विधानसभा बरखास्तीचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून सरकार स्थापनेसाठी काँग्रेस सज्ज असून  राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी काँग्रेसला आपला दावा सिद्ध करण्याची संधी द्यावी. काँग्रेसची मागणी मान्य न झाल्यास प्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाणार असल्याचे विरोधी पक्षनेता चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.

येथील काँग्रेस भवनात घेण्यात आलेल्या  पत्रकार परिषदेत कवळेकर  म्हणाले, की भाजप सरकारचा आधीचा अनुभव पाहता विधानसभा कधीही भंग केली जाऊ शकते. मतदारांनी आमदारांना पाच वर्षासाठी निवडून आणले असून दोन वर्षातच पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणे योग्य नाही. नव्याने निवडणूक घेतल्यास राज्यावर आर्थिक बोजा पडणार असून ते कोणाच्याच फायद्याचे नाही. यामुळे विधानसभा भंग न करता राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, अशी विनंती राज्यपालांना लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर , प्रवक्‍ते ट्रोजन डिमेलो, उर्फान मुल्ला, जनार्दन भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.