Tue, May 26, 2020 07:37होमपेज › Goa › शिरोडकरांना हरवणे हेच काँग्रेसचे ‘लक्ष्य’: चोडणकर

शिरोडकरांना हरवणे हेच काँग्रेसचे ‘लक्ष्य’: चोडणकर

Published On: Feb 23 2019 1:37AM | Last Updated: Feb 23 2019 1:39AM
पणजी : प्रतिनिधी

शिरोडा मतदारसंघात होणा़र्‍या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची काँग्रेस पक्ष नेतृत्वाने गुरुवारी  संध्याकाळी उशीरापर्यंत मडगावात बैठक घेऊन  चर्चा केली. पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याला सर्वांनी पाठिंबा देऊन विजयी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. काँग्रेस पक्षाला दगा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुभाष शिरोडकर यांचा पराभव हेच मुख्य ‘लक्ष्य’ काँग्रेस पक्षाने ठेवले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

मडगावात झालेल्या बैठकीला काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार, प्रचार प्रमुख तथा आमदार दिगंबर कामत, शिरोडा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेले आमदार रवी नाईक, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, दक्षिण गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस आदी नेते उपस्थित होते.

चोडणकर म्हणाले, की काँग्रेसच्या उमेदवारीवर शिरोडा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले सर्व संभाव्य उमेदवारांना मडगावच्या बैठकीत एकत्र आणण्यात आले. 

यामध्ये डॉ. सुभाष प्रभुदेसाई, तुकाराम बोरकर, नीलेश गावस, जिल्हा पंचायत सदस्य जयदीप शिरोडकर, अ‍ॅड. दिया शेटकर, स्नेलो ग्रासिएस, दिनकर सालेलकर, म्हाळू नाईक, मनोहर नाईक व सुशांत गांवकर यांचा समावेश होता. या सर्वांनी पक्ष जो उमेदवार निश्‍चीत करेल त्याला एकमताने पाठिंबा देण्याचे आणि त्यासाठी काम करण्याचे मान्य केले.