Fri, May 29, 2020 21:14



होमपेज › Goa › विरोधी पक्षनेतेपदासाठी  कामत यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींची संमती

विरोधी पक्षनेतेपदासाठी कामत यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींची संमती

Published On: Jul 18 2019 1:57AM | Last Updated: Jul 18 2019 1:57AM




पणजी : प्रतिनिधी

अखिल भारतीय काँग्रेस समितीने राज्य  विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून दिगंबर कामत यांच्या  नावाला संमती दिली आहे, अशी माहिती गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे चोडणकर यांनी दिगंबर कामत यांचे अभिनंदन करून त्यांना जनसेवा आणि पक्षसेवेत   यश लाभो, अशी शुभेच्छा व्यक्‍त केली आहे. 

कामत यांना पूर्ण सहकार्य आणि समर्थन देण्याचे आश्‍वासन देऊन चोडणकर यांनी पत्रकात म्हटले आहे,  की कामत यांच्या दीर्घ राजकीय अनुभवामुळे ते पक्षाला राज्यात मोठ्या उंचीपर्यंत नेतील. राज्यातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन ते राज्य सरकारतील भ्रष्टाचार  आणि  जनविरोधी निर्णय लोकांपुढे उघडे पाडतील, अशी आशा काँग्रेसजन व्यक्‍त करीत आहेत. 

काँग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी गेल्या शुक्रवारी भाजपात प्रवेश केला होता. खुद्द काँग्रेसचे  विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या आमदारांनी पक्ष सोडल्यामुळे विधानसभा अधिवेशनात काँग्रेसला नामुष्की पत्करावी लागली होती. पावसाळी अधिवेशन सुरू होऊन तीन दिवसांनी कामत यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबत पक्षश्रेष्ठींनी संमती दिली असून कामत यांना हे पद सभापती राजेश पाटणेकर गुरुवारी जाहीर करण्याची  शक्यता आहे.