Wed, May 27, 2020 04:18होमपेज › Goa › अटीतटीच्या लढतीत सार्दिनची बाजी

अटीतटीच्या लढतीत सार्दिनची बाजी

Published On: May 24 2019 2:27AM | Last Updated: May 25 2019 2:08AM
मडगाव : प्रतिनिधी 

लोकसभेच्या दक्षिण गोवा मतदारसंघाच्या पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता फातोर्डा मतदारसंघातून सुरुवात करण्यात आली होती. त्यात काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन मताधिक्य राखून होते. सकाळी दहा वाजेपर्यंत सुमारे वीस टक्के मतमोजणी पूर्ण झाली होती. एकूण 85 हजार मतमोजणी पूर्ण झाली होती तर फ्रान्सिस सार्दिन सुमारे नऊ हजार मतांनी आघाडीवर होते. सासष्टीमधील मतमोजणी सुरू असताना सार्दिन यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती.

दहा वाजता आलेल्या 85044 एवढी मतांची मोजणी झाली होती. यात काँगेसचे सार्दिन यांना 43719 आणि भाजपचे नरेंद्र सावईकर यांना 34846 एवढी मते मिळाली होती. सार्दिन यांनी सुमारे नऊ हजारांची आघाडी घेतली होती. शिवसेनेच्या राखी नाईक यांना 294, अपक्ष डॉ कालिदास वायगणकर यांना 246 आणि मयूर खणकोणकर यांना 293 एवढी मते प्राप्त झाली होती. आपच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून होते पण ते साडेचार हजार एवढीच मते मिळवू शकले.

नोटाची संख्या यावेळी शिवसेना आणि दोन्ही अपक्ष उमेदवारांच्या एकूण मतांएवढी होती. सकाळी दहा वाजता अपडेट झालेल्या माहितीनुसार नोटाची संख्या 1178 एवढी झाली होती.

साडेदहा वाजता आलेल्या अपडेट माहितीनुसार सार्दिन यांचे मताधिक्य कमी झाले होते. भाजपचे नरेंद्र सावईकर यांच्या मतात सुमारे आठ हजारात वाढ झाली होती. सावईकर 42898, फ्रान्सिस सार्दिन 53140 आणि आपचे एल्विस गोम्स यांना 6131 एवढी मते मिळाली होती.

काँगे्रसचे सार्दिन यांचे मताधिक्य उतरू लागले होते. त्यांची आघाडी 8261 वर उतरली होती. पावणे अकराच्या दरम्यान, एक लाख चोवीस हजार एवढी मतमोजणी दक्षिण गोव्यातून झाली होती.
उत्कंठा वाढत चालली होती. मताधिक्य उतरत होते तर सावईकर यांची मते वाढत चालली होती.सावईकर 57667 मतांनी चालत होते, तर फ्रान्सिस सार्दिन यांना 63614 एवढी मते मिळाली होती. सार्दिन यांची आघाडी उतरून 5946 वर आली होती. पुन्हा अकरा वाजता ते 9228 च्या आघाडीवर पोचले होते पण लगेच त्यांची आघाडी उतरून 6721 मतांवर आली होती. सार्दिन यांची आघाडी उतरत चालली होती. अकरा वाजता सार्दिन यांचे मताधिक्य कमी होऊन ती 6421 वर पोचली होती. 

केपे तालुक्यातील मतमोजणीला सुरुवात होताच नरेंद्र सावईकर यांनी मोठी मजल मारून मतांचा आकडा 83158 पोचवला होता. सार्दिन 85496 वर होते. आपचे एल्विस गोम्स यांच्या मतांचा आकडा केवळ साडेनऊ हजार वर पोचला होता. दरम्यान सार्दिन यांच्या मतात घट होत चालली होती.मध्येच त्यांची आघाडी एकदम खाली उतरून 1561 मतांवर पोचली होती पण पुन्हा त्यांची आघाडी वाढून 3391 मतांवर पोचली होती.

भाजप आणि काँगेसच्या मतांमध्ये वरचढ होत असतांना नोटाची संख्या मात्र वाढत जाऊन अडीच हजारांवर पोचले होते.दुपारी तीन वाजता मतमोजणीच्या दुसर्‍या फेरीला सुरुवात करण्यात आली.या वेळी सार्दीन केवळ दीड हजार मतांनी सावईकर यांच्या पासून आघाडीवर होते.दुपारी साडेतीन वाजता नावेली मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात करण्यात आली असता सार्दिन यांची आघाडी थेट साडेतीन हजारांवर जाऊन पोचली.

नावेली नंतर वेळळ्ी मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात होताच सार्दिन यांची आघाडी वाढून 4471 जाऊन पोहचली होती.त्यामुळे पुन्हा भाजपच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.सायंकाळी साडेचार वाजता सासष्टी भागातील मतमोजणी दरम्यान सावईकर बरेच पिछाडीवर गेले होते. सार्दीन यांना तब्बल 11445 मंतांची आघाडी मिळाली होती.शेवटच्या फेरीत 419532 मंतांची मोजणी झाली होती. त्यासार्दिन सावईकर यांच्या पेक्षा 9890 मतांनी आघाडीवर होते.