Wed, Jun 26, 2019 01:04होमपेज › Goa › भाजप कार्यकर्त्यांना काँग्रेसचीच चिथावणी

भाजप कार्यकर्त्यांना काँग्रेसचीच चिथावणी

Published On: Dec 23 2018 1:08AM | Last Updated: Dec 23 2018 1:08AM
पणजी :  प्रतिनिधी

भाजप कार्यकर्त्यांवर काँग्रेसकडून करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. उलट मोर्चावेळी  काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना चिथवण्याचे काम केले, असा आरोप भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी पत्रकार परिषदेत केला. मोर्चासाठी भाजपकडून आवश्यक ती परवानगी घेण्यात आली होती. त्यामुळे परवानगीसंदर्भात करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

कांदोळकर म्हणाले, भाजपचा मोर्चा शांततापूर्ण होता. मात्र, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो व त्यांच्या सहकार्‍यांनी त्यात व्यतय आणण्याचा प्रयत्न केला. पोलिस महासंचालकांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी दिलेल्या निवेदनात भाजप कार्यकर्त्यांवर खोटे आरोप केले असल्याचे कांदोळकर यांनी सांगितले.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चेकर्‍यांना चिथवण्याचे काम केले. काँग्रेसकडून राज्यभरात आयोजित केल्या जाणार्‍या जनआक्रोश आंदोलनात भाजपने कधीच व्यत्यय आणला  नाही. राफेल करारप्रश्‍नी  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे स्पष्टीकरण मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. भाजपवरील सर्व आरोप चुकीचे असून केवळ विषयांतर करण्यासाठी ते केले जात असल्याचा आरोप कांदोळकर यांनी केला.

मोर्चावेळी महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी चपल फेकून मारली होती. सदर चप्पल डोळ्यावर बसल्याने अंकीत महात्मे हा कार्यकर्ता जखमी झाला. सत्य काय ते पोलिस तपासात समोर येईल, असेही  कांदोळकर यांनी  स्पष्ट केले. प्रेमांनद म्हांब्रे, दत्तप्रसाद नाईक व हेमंत गोलतकर यावेळी उपस्थित होते.