Sun, May 31, 2020 16:08होमपेज › Goa › म्हापशात काँग्रेस- राष्ट्रवादी युती शक्य

म्हापशात काँग्रेस- राष्ट्रवादी युती शक्य

Published On: Mar 05 2019 1:46AM | Last Updated: Mar 04 2019 11:42PM
बार्देश  : प्रतिनिधी

म्हापसा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रस व काँग्रेस पक्षाची युती होणार असून म्हापशातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणुकीत उभा करणार असल्याचे गोव्याचे राष्ट्रवादी पक्षाचे माजी निरीक्षक दिगंबर शिरोडकर यांनी रविवारी सांगितले.

राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे यांच्या खोर्ली-  म्हापसा येथे बैठकीत दिगंबर शिरोडकर बोलत होते. यावेळी संजय बर्डे, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित कार्यकत्यार्ंनी चर्चेवेळी आपली मते मांडून तीन मतदार संघात पोटनिवडणुका  होणार असून  त्यातील  राष्ट्रवादी  काँग्रेस म्हापशात एक उमेदवार व इतर मतदार  संघात दोन काँग्रेसचे उमेदवार ठेवण्याची मागणी केली आहे. पुढे बोलताना दिगंबर शिरोडकर म्हणाले, म्हापशामध्ये राष्ट्रवादी पक्षाला जागा मिळावी म्हणून आम्ही जोरदार प्रयत्न केले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँगे्रस  पक्ष यांची युती होणार असल्याची चिन्हे  आहेत आणि म्हापशाची जागा राष्ट्रवादी पक्षाला मिळणार यावर आम्हाला विश्‍वास आहे. तरीही येत्या चार दिवसात राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांची मुंबईला भेट घेणार असल्याचे  ते म्हणाले.

संजय बर्डे यांनी सांगितले की, येत्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी  काँग्रेस व  काँग्रेस पक्ष यांची युती होणे आवश्यक आहे. ती झाल्यास म्हापशातून राष्ट्रवादीला जागा  मिळावी  म्हणून कार्यकत्यार्ंकडून मागणी केली जात आहे. सद्या म्हापशातील अनेक विकास कामे रखडली आहे परंतू त्याकडे आजपयर्ंत कुणी लक्ष दिले नाही.  राष्ट्रवादीचे गोवा  प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांची भेट घेतली. त्यांच्याशीही चर्चा केल्याचे बर्डे म्हणाले.  येत्या चार दिवसांत शरद पवारांची भेट घेऊन  त्यांच्याशी चर्चा करूनच युतीबाबत शिक्कामोर्तब होईल. या बैठकीत  कार्यकर्ते उपस्थित होते. 10 मार्च रोजी मेळावा होईल, त्यात पुढील राजकीय दिशा ठरवली जाणार आहे.