Wed, Jul 08, 2020 12:37होमपेज › Goa ›  इफ्फी सुवर्णमहोत्सवी महावीर उद्यानात चिल्ड्रन्स पार्क व आर्ट पार्क

 इफ्फी सुवर्णमहोत्सवी महावीर उद्यानात चिल्ड्रन्स पार्क

Last Updated: Nov 16 2019 6:42PM
पणजी : प्रतिनिधी 

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) सुवर्णमहोत्सवी वर्षी यंदा पणजीतील महावीर उद्यानात चिल्ड्रन्स पार्क व आर्ट पार्क उभारले जाणार आहे. चिल्ड्रन्स पार्क हे २१ ते २८ नोव्हेंबर पर्यंत संध्याकाळी ६.३० पासून सर्वांसाठी विनाशुल्क खुले असणार आहे. लहान मुलांसोबत सर्व वयोगटातील लोकांसाठी या ठिकाणी मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

 चिल्ड्रन्स पार्क मध्ये मॅजिक शो, फेस पेंटिंग, झुंबा विभाग, क्‍लाउन्स अ‍ॅक्ट, स्टिल्ट वॉकर क्‍लाउन, बलून मोल्डींग, थ्री डी गेम्स, बाउंन्सी कासल, खेळ, नृत्य सादरीकरण, स्पॉट बक्षिसे, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील असतील. त्यामुळे लहान मुलांसाठी हे पार्क म्हणजे मनोरंजनाचा खजिना असेल.  इफ्फी रोज संध्याकाळी हे कार्यक्रम होणार आहेत.  

इफ्फीत खास करून युवा प्रेक्षकांसाठी असलेले आर्ट पार्क हे २२ ते २९ नोव्हेंबर पर्यंत संध्याकाळी ७ नंतर सर्वांसाठी खुले असेल. आर्ट पार्क मध्ये इंग्रजी बँड, डीजे लायन अप, आंतरराष्ट्रीय नृत्य सादरीकरण, एक्रोबेट्स, फायर डान्सर्स, इंडी-पॉप संगीताचे शोज, आर्ट इन्स्टॉलेशन तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी असतील. महावीर उद्यानात तंबूतील सिनेमांसह विविध मनोरंजक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.