Mon, May 25, 2020 12:09होमपेज › Goa › गोवा : 'म्हादई प्रश्नी मुख्यमंत्री सावंत यांना अपयश' 

गोवा : 'म्हादई प्रश्नी मुख्यमंत्री सावंत यांना अपयश' 

Last Updated: Mar 05 2020 7:02PM

पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना फ्रंटचे नेते अ‍ॅड.ह्दयनाथ शिरोडकरपणजी : पुढारी वृत्तसेवा 

प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवातर्फे रविवार ८ मार्च रोजी पणजीत रन फॉन म्हादई या रॅलीचे आयोजन केले होते. या रन फॉन म्हादई या रॅलीला सरकारने कुठल्याही ठोस कारणांशिवाय परवानगी नाकारली, असा आरोप फ्रंटचे नेते अ‍ॅड. ह्दयनाथ शिरोडकर यांनी गुरुवारी पणजीत पत्रकार परिषदेत केला.

म्हादई वाचवण्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अपयश आले आहे. त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नसून त्यांनी त्वरीत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

वाचा :चीनसह बारा देशांतून येणार्‍या प्रवाशांची आता सक्‍त तपासणी

अ‍ॅड. शिरोडकर म्हणाले की, म्हादई जलतंटा लवादाने कर्नाटकला दिलेला निवाडा केंद्राने अधिसूचीत करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मंजुरी विरोधात गोवा सरकारला याचिका दाखल करण्याची गरज वाटली नाही. कळसा भांडूरा प्रकल्पाच्या ठिकाणी संयुक्‍त पाहणी करण्याची गोव्याची मागणी देखील न्यायालयाने फेटाळली. यावरुन गोव्याची म्हादई प्रश्‍नी बाजू किती कमजोर आहे. हे सिध्द होत आहे. म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटकने बेकायदेशीरपणे कालवा बांधला. मात्र त्याची गोवा सरकारने आवश्यक ती दखल घेतली नाही. म्हादई वाचवण्यासाठी जे जे प्रयत्न आवश्यक आहेत. ते सर्व प्रयत्न करण्यात गोव्याला अपयश आले असल्याची  टीका त्यांनी  केली.

वाचा :चिंबल सरपंचावर कारवाईचे उच्च न्यायालयाचे निर्देश