Wed, May 27, 2020 11:33होमपेज › Goa › बैठकीसाठी मुख्यमंत्री सावंत दिल्लीला रवाना

बैठकीसाठी मुख्यमंत्री सावंत दिल्लीला रवाना

Published On: Jun 14 2019 1:52AM | Last Updated: Jun 13 2019 11:47PM
पणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नीती आयोगाच्या बैठकीसाठी गुरूवारी संध्याकाळी दिल्लीला रवाना झाले. मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, खाण मंत्री प्रल्हाद जोशी, पर्यावरण मंत्री हर्ष वर्धन, मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांचीही भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नीती आयोगाची बैठक दिल्लीत शनिवार दि.15 जून रोजी होणार असून त्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. दिल्ली दौर्‍यामुळे मुख्यमंत्री 14 ते 16 जून या कालावधीत जनतेला भेटण्यास उपलब्ध होणार नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून कळवण्यात आले आहे.